MGNREGA Wage Rates : मनरेगाच्या मजुरांसाठी खुशखबर! मोदी सरकारने वाढवले वेतनाचे दर

काय आहेत नवे दर?


नवी दिल्ली : 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने' (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. सरकारने मनरेगाच्या मजुरीच्या दरात ३ ते १० टक्के वाढ (MGNREGA Wage Rates) केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना आज जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections) वाढलेले वेतन दर २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी (Financial year) आहेत. मनरेगा कामगारांसाठी १ एप्रिल २०२४ पासून नवीन मजुरी दर लागू होतील.


नव्या दरांनुसार आता प्रत्येक राज्यातील कामगारांना जास्त वेतन मिळणार आहे. गोव्यात मजुरीच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. गोव्यात सर्वाधिक १०.५६ टक्के वाढ झाली आहे. तर उत्तर प्रदेशात केवळ ३.०४ टक्के वाढ झाली आहे.



काय आहेत नवे दर?


गोव्यातील कामगारांना पूर्वी ३२२ रुपये प्रतिदिन मिळत होते, ते आता वाढून ३५६ रुपये झाले आहे.


कर्नाटकात मनरेगाचा दर ३४९ रुपये झाला आहे, जो पूर्वी ३१६ रुपये प्रतिदिन होता.


मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मनरेगा कामगारांचा मजुरी दर २२१ रुपयांवरून २४३ रुपये प्रतिदिन झाला आहे.


उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मजुरांची रोजची मजुरी २३० रुपयांवरून २३७ रुपये झाली आहे.


हरियाणा, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, राजस्थान, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मनरेगा कामगारांचे दर ७ टक्क्यांनी वाढले आहेत. आता त्यांची रोजची मजुरी २६७.३२ रुपयांवरून २८५.४७ रुपये झाली आहे.

Comments
Add Comment

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड

कोल्ड्रिफ कफ सिरप कंपनीचा परवाना तामिळनाडू सरकारकडून रद्द

तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करत,

ईपीएफओचा मोठा निर्णय, पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची परवानगी

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित

भारत ब्रह्मपुत्रा नदीवर तयार करणार जलसाठा प्रकल्प

चीनच्या ७७ अब्ज डॉलर्सच्या हायड्रो प्रकल्पाला देणार प्रत्युत्तर नवी दिल्ली : ब्रह्मपुत्र नदीवर चीनने सुरू