Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

SRH vs MI: हैदराबादने रचला इतिहास, IPL च्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या

SRH vs MI: हैदराबादने रचला इतिहास, IPL च्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने(sunrisers hyderabad) इंडियन प्रीमियर लीगच्या(indian premier league) इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. आयपीएल २०२४च्या आठव्या सामन्यात मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने २० षटकांत केवळ ३ गडी गमावत तब्बल २७७ धावा केल्या. हैदराबादने स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्येचा आधीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रेकॉर्डही तोडला.


आरसीबीने २०१३मध्ये २६३ धावा केल्या होत्या. हैदाराबादच्या या धडाकेबाजी खेळीची सुरूवात ट्रेविस हेडने केली. याला अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी पुढे नेले. क्लासेनने ३४ बॉलमध्ये ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा तडकावल्या. याशिवाय अभिषेकने ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने २३ बॉलमध्ये ६३ धावा केल्या तर हेडने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २४ बॉलमध्ये ६२ धावा केल्या.


मुंबईने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या ट्रेविस हेड आणि मयंक अग्रवालने चांगली सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची खेळी केली. यानंतर मयांक बाद झाला.


त्यानंतर ट्रेविस हेड बाद झाला. ट्रेविस हेडने २४ बॉलमध्ये ६२ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माने ६३ धावांची खेळी केली.



मुंबईच्या बॉलर्सची दमदार धुलाई


मुंबईच्या बॉलर्सना हैदराबादच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले. पदार्पण कऱणाऱ्या क्वेना मफाकाने ४ षटकांत तब्बल ६६ धावा दिल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने ४ षटकांत ४६ धावा खर्च केल्या आणि एक विकेट मिळवली. बुमराहने ४ षटकांत ३६ धावा दिल्या. तर २ ओव्हरमध्ये पियुष चावलाने १ विकेट घेत ३४ धावा दिल्या.

Comments
Add Comment