मुंबई: बदलत्या वातावरणासोबत तापमानातही वाढ होत आहे. यामुळे लोकांच्या डाएटमध्येही बदल होतो. लोक आपल्या आरोग्य चांगले राह्यासाठी विविध प्रकारच्या पेय पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करतात. सोबतच फळांचेही सेवन करतात. यामुळे तापमानाचा परिणाम त्यांच्या शरीरावर पडता कामा नये आणि आरोग्य चांगले राहावे.
उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी कोल्ड्रिंक पितात. मात्र ते पिण्याऐवजी तुम्ही ताक पिऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्यासही त्रास होणार नाही. यामुळे शरीराला डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
ताकामध्ये अनेक पोषकतत्वे असतात जसे कॅल्शियम, प्रोटीन,व्हिटामिन, ए, बी,सी, ई के सह अँटीऑक्सिडंटही असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता. जर तुम्हाला अॅसिडिटी, पोटात जळजळ असा त्रास आहे तर तुम्ही ताकाचे सेवन करा.
ताक पिताना नेहमी त्यात काळे मीठ अथवा सैंधवचा वापर करावा. यामुळे ताक पचण्यास सहज होते.