कैदेत असताना आदेश देणे केजरीवाल यांना पडणार भारी ?; आता ईडी करणार ही कारवाई

नवी दिल्ली : कैदेत असताना आदेश देणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कोठडीत असताना मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल हे कसे आदेश देवू शकतात याबाबत कायदेतज्ञांची मते ईडीने मागविली आहेत. आतापर्यंत एखादया मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला अटक झाल्यानंतर तो आधी राजीनामा देत असे. केजरीवाल यांनी राजीनामा दिला नसला तरी, त्यांना त्या पदावर राहता येणार नाही, याबाबत कायद्यात काही तरतुद आहे का याची सखोल चौकशी ईडीकडून केली जात आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य घोटाळ्यात अटक केली आहे.कोठडीत असताना केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यातच त्यांनी कोर्टात असताना एक आदेश जारी केला. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी म्हटले की मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पाणी आणि सांडपाणी संबंधित लोक कल्याणाची कामे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ईडीने आता या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पीएमएलए कायद्यानूसार हा आदेश योग्य आहे की नाही याची तपासणी ईडी करणार आहे.


न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडीत असलेल्या केजरीवाल यांना त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल आणि खाजगी सचिव बिभव कुमार यांना दर सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान केजरीवाल यांना अर्धा तास भेटण्याची परवानगी दिली आहे. यातील अर्धातास केजरीवाल यांना त्यांच्या वकीलांशी चर्चा करण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे या तासाभरातच केजरीवाल हे आपल्या पत्नी आणि सहाय्यक तसेच वकीलांना भेटू शकणार आहेत.

Comments
Add Comment

Rainfall Deficit : देशात पावसाची एकूण तूट 24 टक्क्यांवर, आतापर्यंत 350 लाख हेक्टरवर खरीप पेरणी पूर्ण

नवी दिल्ली : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान

Rajasthan Gang-Rape Case : राजस्थानातील सामूहिक बलात्कार प्रकरणी एनसीडब्ल्यूचे 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : राजस्थानातील श्रीगंगानगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार आणि मानवी तस्करी

Rain Alert : देशभरात मुसळधार पावसाचा कहर; अनेक राज्यांत रेड व ऑरेंज अलर्ट

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत देशातील

Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; ईडीने ४४० कोटींच्या ठेवी गोठवल्या

कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धनशोधन प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत कारवाई करत तृणमूल काँग्रेसच्या

PM Narendra Modi : इंडोनेशिया दौरा पूर्ण करून पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाकडे रवाना; लढाऊ विमानांकडून विशेष एस्कॉर्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंडोनेशियातील तीन दिवसांचा अधिकृत दौरा पूर्ण करून बुधवारी

Khan Sir : खान सरांच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय १० जुलैला, पाटणा दिवाणी न्यायालयाने निकाल राखून ठेवला

पाटणा : कोचिंग वादाशी संबंधित गोळीबार प्रकरणात आरोपी असलेले शिक्षक फैसल खान उर्फ खान सर आणि त्यांच्या दोन