Ruturaj Gaikwadची इतकी आहे नेटवर्थ, जाणून घ्या दर महिन्याला किती कमावतो CSKचा नवा कर्णधार

मुंबई: देशात सध्या क्रिकेट प्रेमींवर इंडियन प्रीमियर लीगचा(indian premier league) फिव्हर पाहायला मिळत आहे. मात्र आयपीएल २०२४ सुरू होण्याआधी एक मोठी उलटफेर पाहायला मिळत आहे. गुरूवारी चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझीने ५ वेळा खिताब जिंकवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व दिले आहे. गायकवाड २७ वर्षांचा आहे आणि फारच कमी वेळात क्रिकेट जगतात ओळख बनवण्यासोबत कमाईही जोरदार केली आहे. सीएसकेच्या नव्या कर्णधाराकडे कोट्यावधींची संपत्ती आहे.



२७ वर्षांचा आहे सीएसकेचा नवा कर्णधार


भारताचा क्रिकेट ऋतुराज गायकवाडचा जन्म ३१ जानेवारी १९९७च्या पुणे शहरात झाला होता. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटमध्ये आवड होती. वयाच्या १९व्या वर्षी २०१६-१७ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलमध्ये त्याची एंट्री २०१९मध्ये झाली. यावेळी लिलावादरम्यान चेन्नई सुपर किंग्सदरम्यान त्याला २० लाख रूपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केले होते. आता त्याला सीएसकेचा कर्णधार बनवण्यात आले आहे.



इतकी आहे ऋतुराजची संपत्ती


ऋतुराज गायकवाडची संपत्ती कोट्यावधीमध्ये आहे. आयपीएलची फीही त्याची करोडोमध्ये आहे. त्याची एकूण संपत्ती ३०-३५ कोटी रूपये सांगितली जात आहे. बीसीसीआयच्या सी कॅटेगरीचा खेळाडू ऋतुराज गायकवाड केवळ मॅच फीमधूनच कमाई करत नाही तर ब्रांड एंडोर्समेंट आणि जाहिरातीतून भरपूर पैसे कमवत आहे.


रिपोर्ट्सनुसार ऋतुराज अनेक ब्रांड्सला एंडोर्स करत आहे. यात Games 24X7, GO Kratos, Mount Road Social, SS Cricket Kits या नावांचा समावेश आहे. मॅच फी व्यतिरिक्त एंडोर्समेंट आणि जाहिरातीच्या माध्यमातून ऋतुराज गायकवाड दर महिन्याला ५०-६० लाख रूपयांची कमाई करतो.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे