Swami Samartha : श्री स्वामी समर्थ बावन्नी, स्वामींचा रंगपंचमी संदेश

  151


  • समर्थ कृपा : विलास खानोलकर


स्वामी वदती भक्तासी
काय हवे ते पुसे मजसी ||१||
भक्त बोले आली होळी
गरिबीतही कशी खावी पोळी ||२||
मुला-बाळांसह कशी करावी
रंगपंचमी कशी स्तवावी ||३||
खिशात नाही पै पैसा
पाहुण्यासी कैसे बोलावे बैसा ||४||
नाही विहिरीला पाणी
नाही नदीला पाणी ||५||
उन्हाळ्याने सुकले तळीपाणी
सुकले मुख सुके गळापाणी ||६||
पाहुनी आकाशी जीवने नकोशी
कडक उन्हाने तापली तक्तपोशी ||७||
पिके सुकली मने सुकली
हात पसरूनी माने झुकली ||८||
चाऱ्याचे दुर्भिष्य सूर्याहाती धनुष्य
वाटे आत्महत्येने संपवावे आयुष्य ||९||
आजोबा नातवंडासाठी ढकलतो आयुष्य
आजी सांभाळी नक्षत्र पुष्प ||१०||
खाटकापाशी चालली गाईवासरे
घराघरात द्रारिद्र्य असे पसरे ||११||
सावकार घिरट्या घाली दारी
काळे कभिन्न पठाण दारोदारी ||१२||
स्वामी वदे आधुनिक भक्तासी
नको काळजी ठेवू उषासी ||१३||
उषःकाल उगवेल उद्याशी
यश येईल तुझ्या पायाशी ||१४||
विश्वास ठेव त्या दत्तात्रयाशी
विश्वास ठेव त्या महादेवाशी ||१५||
विश्वास ठेव ब्रह्माविष्णूशी
विश्वास ठेव हनुमान रायाशी ||१६||
विश्वास ठेवत्या श्रीरामाशी
विश्वास ठेव त्या श्रीकृष्णाशी ||१७||
प्रसन्न अग्निदेवी होलिका
जीवनात फुलेल गुलाब कलिका ||१८||
नका जाळू हिरवी झाडे
वाढली दारोदारी लाडेलाडे ||१९||
दुर्गुणा ते जाळा मारूनी कोडे
नका करू धुरांचे लोंढे ||२०||
कपाळी गुलाल लावूनी करा रंगपंचमी
विषारी रंगाने नका करू रंगपंचमी ||२१||
नका पिऊ नवसागराची दारू
नका शोधू रात्री बेरात्री पारू ||२२||
नका खेळू पत्ते जुगार
बंद करा जन्नामन्ना जुगार ||२३||
बंद करा इंटरनेट जुगार
बंद करा बीटकॉईन जुगार ||२४||
मोबाइलचाही अतिरेक बंद करा
रामरक्षा, ज्ञानेश्वरी हाती धरा ||२५||
मनाचे श्लोक, अभंग, मनीधरा
नामदेव तुकाराम मस्तकी धरा ||२६||
वाईटमार्ग, शिव्याशाप बंद करा
आजी-आजोबांना वरिष्टांना प्रणाम करा ||२७||
आईवडील भावंडांना हृद‌यी धरा
गोरगरिबांना मदत करा ||२८||
नैसर्गिकरीत्या शेती करा
नदिनालीतळी साफ करा ||२९||
विहिरी, गावतळी स्वच्छ करा
कौलारूपाणी सांभाळ करा ||३०||
उंच बिल्डिंग पाणी जपुनी धरा
थेंब थेंबपाणी पुनर्वापर करा ||३१||
नका करू नातलगांशी कट
पुरणपोळी कट करा गट्ट ||३२||
संसारात रोजरोज नको कटकट
संसार सुखाने बिनकटकट ||३३||
राधाश्रीकृष्ण व्हा पट पट
बालगणपती व्हा पटापट ||३४||
ऐका सुदामा बलरामाची वटवट
दहीभात पोहे खा पटपट ||३५||
बालहनुमान व्हा पटपट
बालशिवाजी व्हा झट झट ||३६||
सानेगुरुजीचा व्हा श्याम चट पट
बालपणात शिरा पटापट ||३७||
छळणे, पिळणे विसरा पटापट
आनंदाने नाचा, डोला पटापट ||३८||
खळाखळा हसा पटापट
प्या हळदीदूध पटापट ||३९||
फुटाण्याचा प्रसाद वाटा झटपट
पेढे वाटा पटपट ||४०||
आनंदाचा घ्या तीर्थप्रसाद पटापट
आनंदी आनंद होईल पटापट ||४१||
होईल होळी आनंदी पटपट
रंगपंचमी आनंदी पटपट ||४२||
स्वामी सांगे विलासा मंत्र पटप‌ट
उज्ज्वल आयुष्य भेटेल झटपट ||४३||
रंगुनी रंगात रंग माझा वेगळा
मोरपिसापरी छान तो नव्हाळा ||४४||
इंद्रधनुष्यापरी मी आकाशी वेगळा
सप्तरंगात असूनी मी तो वेगळा ||४५||
ब्रह्माविष्णुमहेशातही मी वेगळा
दत्तात्रयाच्या अत्तराहू‌नी मी वेगळा ||४६||
गावागावात सुंगध माझा वेगळा
औंदुबर, वटसावित्रीचा वड वेगळा ||४७||
मी गुलाबातल्या गुलाबी रंगात
मी सोनचाप पिवळ्या रंगात ||४८||
मी सुंगधी मोगऱ्याच्या सफेद रंगात
मी सुंदर जास्वंदाच्या लाल रंगात ||४९||
मी मेहंदीच्या पानात हिरव्या रंगात
मी कण्हेरीच्या तांबड्या रंगात ||५०||
गंगेच्या पाण्यापरी मी साऱ्या रंगात
सुखदुःखाच्या वेळी मी साऱ्या ढंगात ||५१||
आदी मी अनादी मी अमर मी
आनंदी होळी संदेश देतो स्वामी ||५२||



vilaskhanolkardo@gmail.com

Comments
Add Comment

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

गणेश चतुर्थी म्हटली की महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा सोहळा सुरू होतो. हा केवळ धार्मिक सण नसून, प्रत्येक

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला ‘या’ राशी आहेत सर्वाधिक प्रिय, त्यांना मिळणार गुडन्यूज

मुंबई: गणेश चतुर्थी हा सण लवकरच येत आहे आणि देशभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

Ganpati Arati : सुखकर्ता, दु:खहर्ता...! गणेशोत्सवात घर दुमदुमवणाऱ्या लोकप्रिय ५ आरत्या

१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! या सोप्या पद्धतीने करा बाप्पाची प्राण प्रतिष्ठा, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

मुंबई : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण