मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महायुतीच्या (Mahayuti) महत्त्वाच्या नेत्यांसोबत वाढत चाललेल्या भेटीगाठी यांमुळे मनसे (MNS) महायुतीत सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांना थेट दिल्ली दरबारी देखील बोलावण्यात आलं होतं. तिथे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर युतीबाबत राज ठाकरेंनी भाष्य केलं नाही. मात्र, आज पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीच्या नेत्यांसोबत निदर्शनास आले आहेत. महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरु आहे, ज्यात राज ठाकरेही उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे युतीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
महायुतीची हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ही बैठक जागावाटपासाठी बोलावण्यात आली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महायुतीत मनसे सामील झाली तर ठाकरे नाव महायुतीत अधिकृतपणे जोडले जाईल. त्यामुळे आता यापुढे नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…