ISRO Chandrayaan-3 : अभिमानास्पद! चांद्रयान-३ मोहिमेला जाहीर झाला 'हा' मोठा पुरस्कार

इस्रोने भारताची मान आणखी उंचावली!


मुंबई : २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक घटना घडली, ती म्हणजे भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोची (ISRO) चांद्रयान-३ मोहिम (Chandrayaan-3 Mission) यशस्वी झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ (South pole) उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे जगभरातून भारताचे कौतुक करण्यात आले. यानंतर आता इस्रोने भारताची मान उंचावेल अशी आणखी एक कामगिरी केली आहे.


इस्रोच्या चांद्रयान मोहिमेने अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'एव्हिएशन वीक लॉरेट्स पुरस्कार' (Aviation Week Laureates Award) पटकावला आहे. 'चांद्रयान-३' मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला देण्यात आला. "इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ (S. Somanath) यांनी चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशातून पुढे जात, चांद्रयान-३ मोहिम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा हा पहिला देश ठरला." असं अधिकृत अवॉर्ड घोषणेत म्हटलं होतं.





यात पुढे म्हटलं आहे, "अवघ्या ७५ मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे." इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा