मुंबई: खराब लाईफस्टाईल, प्रदूषण तसेच चुकीच्या डाएटमुळे त्वचा निस्तेज होणे सामन्य गोष्ट आहे. हेल्दी त्वचेसाठी या सर्व गोष्टींची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. जर तुम्हाला वाटत असेल की आपली त्वचा तरूण राहावी तर तुम्ही काही खास प्रकारच्या पदार्थांचे सेवन करू शकता.
त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी तुम्हाला बॅलन्स डाएट घेणे गरजेचे आहे. यात फळे तसेच भाज्यांचा समावेश असेल. यासोबतच अख्ख्या धान्याचा वापरही केला पाहिजे. यामुळे त्वचा हेल्दी आणि मजबूत राखण्यास मदत होते.यातील अँटी ऑक्सिडंट त्वचेला पोषक तत्वे पुरवतात.
अवोकॅडोमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
कलिंगडामध्ये व्हिटामिन ए, ई, सी आढळते जे त्वचेसाठी फायदेशीर असते. यात लायकोपीन आणि अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट असतात जे त्वचा वृद्ध होण्यापासून रोखतात.
रताळ्यामध्ये व्हिटामिन ए असते जे फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी कऱण्यात फायदेशीर ठरतात.
गाजरमध्ये व्हिटामिन ए, बी, एपिजेन, कोलेजन असते जे सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करतात.
टोमॅटोमध्ये लायकोपीन असते जे अँटी एजिंग आहे. याच्या सेवनाने तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…