विकी कौशल नव्हे तर शाहिद कपूर साकारणार 'अश्वत्थामा'ची भूमिका

मुंबई: शाहिद कपूर(shahid kapoor) आपल्या नव्या सिनेमाच्या घोषणेनंतर चर्चेत आला आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ इंडियाने १९ मार्चला #AreYouReady इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटदरम्यान 'अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज'ची घोषणा करण्यात आली.सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होईल. या सिनेमाचा हिरो शाहिद कपूर असणार आहे. पहिल्यांदा शाहिद कपूर एखाद्या पौराणिक सिनेमात काम करणार आहे.



शाहिद बनणार अश्वत्थामा


काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शाहिद कपूरने आपल्या पुढील सिनेमासाठी निर्माते वाशू भगनानीसोबत हात मिळवले आहेत. हे पहिल्यांदा होणार की शाहिद एखाद्या पौराणिक सिनेमात दिसेल. आता प्राईम व्हिडिओच्या इव्हेंटमधून या बातमीला दुजोरा मिळाला आहे. या सिनेमाचे नाव अश्वत्थामा द सांगा कंटिन्यूज असणार आहे. पुजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवण्यात आले आहे. यात शाहिद कपूर महाभारतातील अमर योद्धा अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहे.



विकी कौशल असणार होता हिरो


'अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज' हा सिनेमा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होता. हा सिनेमा उरी द सर्जिकल स्ट्राईकचे दिग्दर्शक आदित्य धर बनवणार होते. या सिनेमात हिरोही विक्की कौशल असणार होता. याचे एक पोस्टरही रिलीज करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी आर्टिकल ३७०च्या ट्रेलर लाँच दरम्यान आदित्य धरने घोषणा केली होती की ते आता हा सिनेमा बनवत नव्हते.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.