२१ महिन्यांच्या चिमुरड्याने अस्थिमज्जा प्रत्यारोपणावर केली मात

Share

वडिलांच्या अस्थिमज्जा द्वारे बाळाला गंभीर रक्ताच्या कर्करोगापासून वाचवले

नवी मुंबई(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यातील कर्जत येथील २१ महिन्यांच्या बाळाने बी-सेल ऍक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियावर (एएलएल) मात केली. एएलएल हा लहान मुलांच्या कर्करोगाचा एक सामान्य प्रकार आहे. गंभीर आजाराचा सामना करत असताना मुलाने रोगावर मात केली, हा प्रवास चमत्कारापेक्षा कमी नव्हता. योग्य स्टेम सेल दाता शोधताना सर्वांना आव्हानांचा सामना करावा लागत होता, मात्र बाळाचे वडील हॅप्लोआयडेंटिकल (अस्थिमज्जा) मॅच म्हणून समोर आले तेव्हा कुटुंबाला पुन्हा आशा वाटू लागली. ‘हॅप्लोआयडेंटिकल’ हा शब्द ‘हॅप्लॉइड’ या शब्दापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘हाफ’.

अस्थिमज्जा प्रत्यारोपणामध्ये, जेव्हा पूर्ण जुळणारा (एकसारखा) दाता उपलब्ध नसतो, तेव्हा सर्वसाधारणपणे कुटुंबातील एक सदस्य, ज्याच्या ऊतींचे प्रकार प्राप्तकर्त्याशी ५०% जुळतात, तेव्हा या हाफमॅच दात्याचा बीएमटी साठी विचार केला जातो, अशा प्रकारे हॅप्लोआयडेंटिकल हा उपचारासाठी एक व्यवहार्य पर्याय ठरतो. बाळाला कोणतेही भावंडे नव्हती आणि विविध रेजिस्ट्रीजमध्ये जुळणारे दाते उपलब्ध नव्हते, अशा परिस्थितीत प्रत्यारोपणाचा निर्णय घेतल्यामुळे छोट्या-रुग्णाला जीवनदान मिळाले. रुग्णाच्या कुटुंबाला सेवाभावी संस्था, क्राउडफंडिंग आणि टाटा व अपोलो हॉस्पिटल्स ट्रस्टकडून चांगले सहकार्य मिळाले, त्यामुळे जीवनरक्षक प्रत्यारोपण प्रक्रिया परवडणारी ठरली.

हा लहान मुलगा आता ल्युकेमियामुक्त झाला आहे आणि बीएमटी करुन १०० दिवस पूर्ण झाले आहेत, ही बाब खरोखरच उल्लेखनीय आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन (बीएमटी) अधिक प्रमाणात प्रचलित झाले आहे, मात्र प्रत्यारोपणानंतरचे सुरुवातीचे १०० दिवस रुग्णासाठी गंभीर स्वरुपाचे असतात. मात्र प्रत्यारोपणा नंतर घेतलेल्या काळजीमुळे रुग्णांसाठी आरोग्यात्मक गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते. ऍक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (एएलएल) हा भारतातील मुलांमध्ये ल्युकेमियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. प्रिकर्सर बी-सेल एएलएल हा सर्वात सामान्य उपप्रकार आहे, ज्याची ६१% प्रकरणे आढळतात. भारतातील एएलएल चे सर्वाधिक प्रमाण २-५ वर्षे वयोगटात आढळतात आणि हे मुलांमध्ये जरा जास्तच सामान्य आहे. पॅथोजेनेसिस आणि मॉलिक्युलर आनुवंशिकतेची चांगली समज, जोखीम-स्तरीय थेरपीचा अवलंब आणि नवीन उपचारात्मक उपलब्धता यामुळे एएलएल असलेल्या मुलांचा जगण्याचा दर आश्चर्यकारकरित्या सुधारला आहे. भारतात एएलएल असलेल्या मुलांचा ५ वर्षांचा जगण्याचा एकूण दर वाढून ८९% एवढा झाला आहे.

रुग्णाचे वडील भावूकपणे म्हणाले की,”हा खरोखरच एक चमत्कार आहे… जेव्हा आम्हाला आमच्या मुलाच्या रक्ताच्या कर्करोगाची धक्कादायक बातमी कळाली, तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली. पण आता आमच्या बाळाला, कर्करोगमुक्त आणि बागडताना पाहून, माझे मन कृतज्ञतेने भरून गेले आहे. सेवाभावी संस्थांचे अथक परिश्रम, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून दिसलेली उदारता आणि टाटा व अपोलो हॉस्पिटल्स सारख्या संस्थांच्या मदतीशिवाय हे यश अशक्यप्राय होते. प्रेम, ऐक्य आणि अनोळखी लोकांनी दाखवलेली सद्भावना-असा अद्भुत प्रवास आम्ही केला आहे.”

डॉ.विपिन खंडेलवाल, पेडिऍट्रिक हेमॅटो-ऑन्कोलॉजी सल्लागार, अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबई म्हणाले,”मुलांमधील ऍक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (एएलएल) हा एक प्रकारचा कर्करोग आहे, जो रक्त आणि अस्थिमज्जावर परिणाम करतो. अस्थिमज्जामधील सामान्य पेशी बाहेर काढणाऱ्या लिम्फोब्लास्ट्स नावाच्या अपरिपक्व पांढऱ्या रक्त पेशींच्या जलद प्रसारामुळे हा रोग उद्भवतो. यामुळे निरोगी रक्त पेशींच्या उत्पादनावर परिणाम होतो, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा, फिकट त्वचा, वारंवार संक्रमण, आणि सहजरित्या जखम होणे किंवा रक्तस्त्राव होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. या बाळाला वारंवार सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास होत होता तसेच एक महिन्यापासून बाळाचे तोंडावाटे अन्न ग्रहण प्रमाण कमी झाले होते. हे बाळ केमोथेरपीवर जगत होते; त्याची प्रकृती खालावल्यामुळे आम्ही अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची शिफारस केली. अस्थिमज्जा प्रत्यारोपणाद्वारे एएलएल सारख्या समस्येसवर उपचार करताना वय आड येत नाही. बाळावर हॅप्लोआयडेंटिकल हेमॅटोपोएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पाडले गेले. प्रत्यारोपण प्रक्रिया केल्यानंतर बाळ आता ल्युकेमियामुक्त झाले आहे आणि बीएमटी झाल्यानंतर आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत.”

डॉ.पुनित जैन, प्रोग्राम समन्वयक-प्रत्यारोपण चिकित्सक, अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबई म्हणाले,”जेव्हा पूर्ण जुळणारा (एकसारखा) दाता मिळत नाही, तेव्हा हॅप्लोआयडेंटिकल प्रत्यारोपण हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येतो. या प्रक्रियेमध्ये दात्याला, विशेषत: कुटुंबातील सदस्याला विचारात घेतले जाते, या दात्याचे ऊतक प्रकार प्राप्तकर्त्याशी अंदाजे ५०% जुळतात. परिणामी, हॅप्लोआयडेंटिकल प्रत्यारोपण हा एक व्यवहार्य उपचारात्मक पर्याय म्हणून उदयास आला आहे. सामान्यतः एक हॅप्लोआयडेंटिकल दाता हा जैविक पालक, मूल किंवा भावंडांपैकी एक असतो. या बाळाला भावंडे नसल्यामुळे त्याच्या वडिलांकडून अस्थिमज्जा प्राप्त केले गेले.”

Tags: leukemia

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

57 minutes ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

1 hour ago

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

2 hours ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

2 hours ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

3 hours ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

3 hours ago