नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेश(arunachal pradesh) आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनऐवजी २ जूनला लागणार आहेत. खरंतर, दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. अशातच मतमोजणीचे काम २ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे. हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी ४ जूनची तारीख ठरवली होती. त्यात बदल केला आहे. आता येथील मतमोजणी २ जूनला होणार आहे.
अरूणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानलभा निवडणुकीसाठी मतदान १९ एप्रिलला होणार आहे. आयोगानुसार विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० मार्चला जारी होईल. यांतर नामांकन प्रक्रिया सुरू केली जाईल. नाव मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्चला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी ४ जूनला होणार होती. अरूणाचलमध्ये लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या ६० जागा आहे. राज्याचा सध्याचा विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने राज्यातील दोन लोकसभा जागांवर विजय मिळवला होता. विधानसभेत भाजपने ४१ जागा जिंकल्या तर जनता दल(युनायटेड)ने सात जागा, एनपीपीने पाच आणि काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला होता. पीपीएने एक जागा जिंकली तर दोन अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…