Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडाIPL आधी KKRला मोठा झटका, हा खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त

IPL आधी KKRला मोठा झटका, हा खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL)च्या १७व्या हंगामाची सुरूवात २२ मार्चपासून होत आहे. आयपीएल २०२४च्या सुरूवातीआधीच कोलकाता नाईट रायडर्सचे टेन्शन वाढले आहे.

संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. मुंबई-विदर्भ यांच्यात रंगलेल्या रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात श्रेयसला पाठीला दुखापत झाली. श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे रणजी फायनलच्या चौथ्या तसेच पाचव्या दिवशी फिल्डिंगसाठी उतरला नाही.

मीडिया रिपोर्टनुसार श्रेयस अय्यर आता पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२४च्या सुरूवातीच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रेयसचे पाठीचे दुखणे पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता कमी आहे.

रणजी ट्रॉफीच्या फायनलदरम्यान मुंबईच्या दुसऱ्या डावात श्रेयसने ९५ धावा केल्या. त्याच्या या खेळी दरम्यान त्याचे पाठीचे दुखणे पुन्हा उफाळून आले.

श्रेयस पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी संपूर्ण आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. एप्रिलमध्ये त्याच्या पाठीची सर्जरी झाली होती. यानंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर गेला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -