मुंबई : मराठी रंगभूमीवर (Marathi Rangbhumi) संगीत नाटके (Musical plays) विशेष गाजली. मराठी रंगभूमीचा प्रदीर्घ इत्हास सागंताना कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (Krishnaji Prabhakar Khadilkar) यांचे नाव हमखास निघते. मराठी रसिकांच्या मनात नाटकाचे अढळ स्थान निर्माण करण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. त्यांनी लिहिलेले ‘संगीत मानापमान’ (Sangeet Manapman) हे नाटक प्रचंड गाजले. आज या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ११३ वर्षे पूर्ण होत आहेत. हा मुहूर्त साधून प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने आगामी ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर १ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सुबोध भावे याने आजवर आपल्या अनेकविध भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जीवनपट असो वा खलनायकी भूमिका सुबोधने प्रत्येक भूमिका आपल्या अभिनयाने जीवंत केली आहे. ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शकाच्या (Director) भूमिकेत दिसणार आहे. याआधी त्याने ‘कट्यार काळजात घुसली’ (Katyar Kaljat ghusali) या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. यातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्याचा नवा चित्रपट ‘संगीत मानापमान’ देखील एक संगीतमय चित्रपट असणार आहे. शंकर एहसान लॉय (Shankar Ehsaan Loy) यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटातील गाणीदेखील तितकीच लोकप्रिय होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘संगीत मानापमान’ या चित्रपटाची कथा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटकाच्या कथेवरुनच प्रेरित आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे यांनी सांभाळली आहे. सुबोधच्या पोस्टवर प्रेक्षकांच्या कमेंट्स पाहता या चित्रपटाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.
मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सहापदरी ऐवजी आठपदरी करण्यात…
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई सागरी किनारा मार्गावरील वांद्रे-वर्सोवा पुलाला तीव्र विरोध दर्शवत जुहू येथील नागरिक आणि…
मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी…
नवी दिल्ली : बलात्कार पीडितेबद्दलच्या टिप्पणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१५) अलाहाबाद उच्च न्यायालयाला फटकारले.…
मोहाली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३१व्या सामन्यात आज पंजाबच्या मैदानावर जबरदस्त सामना पाहायला मिळाला. खरंतर…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पक्ष भक्कम…