Health: हे फायदे वाचल्यावर तुम्ही दररोज केळी खाण्यास कराल सुरूवात

मुंबई: फळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की की केळे हे एक स्वस्त फळ आहे जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे फळ प्रत्येक मोसमात उपलब्ध असते. केळ्यामध्ये व्हिटामिन ए, सी, व्हिटामिन बी६, पोटॅशियम, सोडियम, आर्यन आणि विविध अँटी ऑक्सिडंट आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात. यामुळेच केळी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जातात. दररोज केळ्याच्या सेवनाने शरीरास अनेक लाभ मिळतात.



केळ्याचे फायदे


डायबिटीज नियंत्रणात


केळी डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहेत कारण यात फायबर, स्टार्च, व्हिटामिन, खनिज, फायटोकेमिकल्स आणि अँटी ऑक्सिडंटसह अनेक असे बायोअॅक्टिव्ह कंपाऊड असतात जे साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात.



रोगप्रतिकारक क्षमता वाढते


केळी शरीराला ताकदवर बनवतात. यामुळे इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते. केळ्यामध्ये व्हिटामिन सी आढळते जे इम्युनिटी मजबूत बनवण्यास मदत करतात.



हाडे राहतात मजबूत


केळी हाडांना मजबूत बनवतात. यातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडांना मजबूत बनवण्यास मदत करतात. केळी आणि दूधाचे सेवन दररोज केल्यास हाडे मजबूत होतात.



वेट लॉसमध्ये फायदेशीर


केळ्यामध्ये फायबर आणि व्हिटामिन्स असतात जे वेट लॉस करण्यास मदत करतात. यात आढळणारे गुण वजन घटवण्यासाठी मदत करतात.

Comments
Add Comment

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

Health: वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांनी फिट राहण्यासाठी जरूर खा या ७ गोष्टी

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेक पुरुषांना चाळीशीनंतर आरोग्याच्या अनेक

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे

Health : डाएटमध्ये सामील करा हे ड्रायफ्रुट्स, होणार नाही लिव्हरची समस्या

मुंबई : यकृत (Liver) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पार पाडतो. त्याचे आरोग्य

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.

Health: प्रोटीनचा उत्तम स्रोत! 'या' ५ ड्रायफ्रूट्समुळे मिळेल भरपूर प्रोटीन

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रोटीन