
नवी मुंबई(प्रतिनिधी ) -शिवशंभो मित्र मंडळ यांच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर -१५ येथे ८ मार्च महिला दिनानिमित्ताने फेरीवाल्या भाजीविक्रेत्या महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक रंजना शिंत्रे यांच्या हस्ते महिलांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपजिल्हा संघटक अलका राजे वैशाली घोरपडे उपशहर संघटक बेबीताई लांडगे उपशहर संघटक भाग्यश्री पिसाळ उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन आनिता मारणे बबीता देशमुख कोमल मांढरे संगीता भराडे अरुणा खोपडे मीना मालुसरे यांनी केले होते.महिलांनी केक कापून उत्साहात महिला दिन साजरा केला.