मुंबई: उपवास करणे हे केवळ अध्यात्मिकरित्या नव्हे तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. हिंदू धर्मात तर वर्षभर कोणते ना कोणते उपवास सुरूच असतात. याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. मेडिकल सायन्समध्ये तर इंटरमिटेंट फास्टिंगबाबत अनेक रिसर्च सुरू असतात. अनेक आरोग्य तज्ञांच्या मते तर उपवास हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यांच्या मते दर दिवसाच्या खाण्यामध्ये जास्त गॅप नव्हे तर आठवड्यातून एक दिवस उपवास केल्यास अनेक फायदे होतात.
जेव्हा तुम्ही आठवड्यातून एक दिवस उपवास करता आणि २४ तास काही ात नाही तेव्हा आपले शरीर बॉडीमध्ये जमा असलेले फॅट वापरते. या दरम्यान, कॅलरी असलेले पदार्थ खाऊ नये. तुम्ही पाणी पिऊ शकता. तुम्ही कॅलरी नसलेले कोल्ड ड्रिंक घेऊ शकता. अनेक रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की असे केल्याने वेट लॉस होतो. तसेच मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो. इतकंच नव्हे तर हृदयाच्या आरोग्यासाठीही हे फायदेशीर आहे.
आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. दरम्यान, यासाठीची योग्य पद्धत माहिती पाहिजे. उपवासादरम्यान लोक बटाटा अथवा फ्रुट्स हे अधिक कॅलरीज असलेले पदार्थ खातात. तसेच एक्सरसाईजही करत नाहीत. यामुळे त्यांना अधिक फायदा होत नाही.
२४ तासच्या उपवासाबाबत रिसर्च सांगतात की यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. प्राण्यांवर झालेल्या रिसर्चमध्ये असेही समोर आले की यामुळे कॅन्सरपासूनही बचाव होतो.
डायबिटीजचे रुग्ण, प्रेग्नंट महिला तसेच काही आजार असलेल्या लोकांनी उपवास करू नये.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…