Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

श्री अंबिका योगाश्रमाचे ७ एप्रिल पासून मोफत योग शिबीर

श्री अंबिका योगाश्रमाचे ७ एप्रिल पासून मोफत योग शिबीर

नवी मुंबई(प्रतिनिधी) - : श्री अंबिका योगाश्रम ऐरोली शाखेच्या वतीने ऐरोली येथे सुरू असलेल्या मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे नवीन बेंच ७ एप्रिल२०२४ पासून सुरू होणार आहे. यासाठी, आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन योगाचार्य श्री नित्यानंद प्रभू यांनी केले आहे. शिबिरात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.

परमपूज्य हटयोगी निकम गुरुजी यांनी सुरू केलेल्या श्री अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या वतीने ऐरोली येथील ज्ञानदीप शाळा सेकटर-२ ऐरोली येथे योगाचार्य श्री नित्यानंद प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमासिक मोफत योग शिबीरच्या माध्यमातून योगचे प्रशिक्षण दिले जाते. येत्या ७ एप्रिल२०२४ पासून नवीन बॅचला सुरुवात होत आहे.

निरोगी आयुष्यासाठी योगसाधनेचे महत्व लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन निरोगी आयुष्य जगावे, असे आवाहन श्री नित्यानंद प्रभू यांनी केले आहे. मोफत योग शिबीरासाठी आपले नाव नोंदणी श्री नित्यानंद प्रभू - ९८३३९३०९७९ क्रमांकावर संपर्क साधावा तसेच शिबिराच्या स्थळी देखिल नाव नोंदणी केली जाईल, असे प्रभू यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment