नवी मुंबई(प्रतिनिधी): नवजात बालकांना श्रवणविषयक विविध समस्यांना सामोरे जावे लागते आणि ज्यांचे वेळीच निदान न झाल्यास भविष्यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. डॉ राजेंद्र वाघेला(ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) आणि त्यांची टीम येत्या रविवारी १० मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५ वर्षाखालील मुलांचे मोफत श्रवण तपासणी आणि कॉक्लियर इम्प्लांट समुपदेशन करणार आहे.
पाच वर्षांखालील मुलांमधील श्रवण समस्या हे त्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. या समस्या बहुतेक वेळा जन्मतःच आढळून येतात मातेर बऱ्याचदा याचे वेळेत निदान केले जात नाही. मुलांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरातंर्गत लहानपणापासूनच मुलांच्या श्रवणविषयक आरोग्यावर लक्ष ठेवण्याबाबत पालकांना मार्गदर्शनही केले जाणार आहे.
लहान मुलांमध्ये उपचार न केलेल्या श्रवणविषयक समस्यांचे व त्यांचे दीर्घकालीन परिणाम ही एक चिंतेचा बाब आहे. भाषेचा विकास, सामाजिक कौशल्य, शैक्षणिक तसेच भावनिक विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. नियमित तपासणी आणि वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास श्रवणविषयक समस्या वेळीच ओळखण्यात मदत होऊ शकते. श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांसाठी हे शिबिर नक्कीच फायदेशीर ठरेल. सर्वच नवजात बाळांची श्रवणशक्ती तपासणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया डॉ राजेंद्र वाघेला (ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) यांनी व्यक्त केली.
डॉ वाघेला पुढे सांगतात की, या शिबिरात, मुलांमधील कॉक्लियर इम्प्लांटबाबत समुपदेशन जाणार आहे जे पारंपारिक थेरपी सत्रांच्या पलीकडे जाऊन मुलांना त्यांच्या श्रवणातील फरक आत्मसात करण्यास आणि स्वतःमधील आत्मविश्वास वाढविण्यास सक्षम करते. कॉक्लियर इम्प्लांटमुळे प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी शक्य होते. श्रवणदोषांशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी आत्मविश्वास वाढविण्यासही याची मदत होते.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…