मुंबई: भारतीय संघ(team india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशालामध्ये खेळवला जात आहे. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. स्पिनर कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या तर रवीचंद्रन अश्विनने ४ विकेट घेतल्या.
यानंतर भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ विकेट गमावताना १३५ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल नाबाद आहेत. कुलदीपने ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. गेल्या १०० वर्षांच्या इतिहासाक सर्वात कमी बॉलमध्ये १८७१ बॉलमध्ये ५० कसोटी विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
याशिवाय कुलदीप कसोटी इतिहासात सर्वाधिक कमी १८७१ बॉलमध्ये ५० कसोटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. कुलदीपने याबाबतीत अक्षर पटेलचा रेकॉर्ड तोडला आहे. सोबतच सगळ्यात वेगवान ५० विकेट घेण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे सहावा भारतीय बनला आहे.
५० विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये कुलदीप यादवचा स्ट्राईक रेट ३६.८ जगात दुसरा बेस्ट आहे. याबाबतीत पहिल्या स्थानावर इंग्लंडचा जॉर्ज लोहमॅन(३४.१) आहे.