कैद्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधता येणार नातेवाईकांशी संवाद

पनवेल : कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाइकांना तासनतास उभे राहावे लागते. मात्र, आता नातेवाइकांना ई-मुलाखतच्या माध्यमातून थेट वीस मिनिटे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलता येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते तळोजा मध्यवर्ती कारागृहात झाले. यावेळी अपर पोलिस महासंचालक प्रभात कुमार, तळोजा कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, तुरुंग अधिकारी राहुल झुताळे आदी उपस्थित होते.


तळोजा कारागृहातील कैद्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या नातेवाईकांना ई मुलाखत देता येणार आहे. ई किस्कॉय आणि ग्रुप फोन ही एक नवीन सुविधा आहे. तळोजा कारागृह हा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील पहिला कारागृह आहे. २००८ साली सुरु झालेल्या या कारागृहात सध्याच्या घडीला जवळपास ४०० कैद्यांची जागा असलेल्या या तुरुंगात तीन हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये बॉम्बस्फोट, दंगल, नक्षलवादी, देश विघातक घटना आदींसह अनेक मोठ मोठ्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा समावेश आहे. या बायोमेट्रिक टच स्क्रीन मशीनमुळे कैद्यांना कुटुंबातील सदस्यांच्या सेलफोन नंबरवर सणाच्या शुभेच्छा पाठवता येणार आहेत.



दुसऱ्या सुविधेच नाव ग्रुप फोन सुविधा आहे. एलन ग्रुप या तामिळनाडू स्थित कंपनीने सर्वप्रथम देशात हि सुविधा उभारली आहे. यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृहात ४० कॉलिंग बूथ स्थापित केले आहेत. राज्याच्या गृहविभागाने तामिळनाडूस्थित कंपनीची मोफत कैदी कॉलिंग प्रणाली सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार तळोजा कारागृहात या सुविधांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भायखळा कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, उपअधीक्षक महादेव पवार, तुरुंग अधिकारी राहुल झुटाले आदी उपस्थित होते. कैद्यांना आठवड्यातील ३ वेळा फोन करता येणार आहे. ६ मिनिटांच्या या फोन दरम्यान नातेवाईक, वकील आदींना फोन करता येणार आहेत.एकुण १० मशीन तळोजा कारागृहात बसविण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे कैद्यांच्या नातेवाईकांना कारागृहात कैद्यांना भेटण्यासाठी कारागृहाचे खेटे मारण्याची गरज नाही.

Comments
Add Comment

IPL 2026 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईच्या संघात कुलदीप यादवची एन्ट्री तर RCB मध्येही मोठा बदल

चेन्नई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

New Jail In Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात ११ एकर भूखंडावर उभारणार नवे कारागृह

मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द

France Football : फ्रान्सचा वर्ल्ड कप संघ जाहीर; कीलीयन मबंप्पेला कर्णधारपद ,कोलो मुआनी संघाबाहेर

पॅरिस : आगामी 2026 FIFA World Cup साठी फ्रान्सने २६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. २०२२ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध

Kireon Pollard: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! कायरन पोलार्डवर BCCI ची कारवाई

IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमधील ५८ व्या साखळी सामन्यात अर्थात लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला.

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या