मुंबई: सन टीव्हीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ तसेच झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मंगल राणेने आपल्या खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. ती नुकतीच विवाहबद्ध झाली.
याचे फोटोच मंगलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या भागात मंगल दिसली होती. तिने या मालिकेत शोभा ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
त्यानंतर ती सन टीव्हीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेतही दिसली होती. या मालिकेत तिने शालग्याची भूमिका साकारली होती.
शालग्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. अनेकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते.
‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही मालिका कोकणात चित्रीत करण्यात आली होती.
मंगल आता आपल्या खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे. तिने संतोष पेडणेकर यांच्याशी विवाह केला आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…