मुंबई: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचा ३ दिवसांचा सोहळा संपला आहे. जगभरातील कानाकोपऱ्यातून आलेले पाहुणे परतत आहे. मात्र या तीन दिवसांच्या सोहळ्यात जगाने अनंत-राधिका यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशची जी झलक पाहिली आहे ती साऱ्यांचाच लक्षात राहील.
मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाआधी आयोजित केलेल्या या सोहळ्यात वारेमाप खर्च केला आहे. असे अनुमान लावले जात आहे की या सोहळ्यासाठी तब्बल १००० कोटी रूपये खर्च झाले आहे. मुकेश अंबानी यांच्यासाठी ही रक्कम काही मोठी नाही. एका रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांची नेटवर्थ साधारण ११३ बिलियन डॉलर आहे.
मुकेश अंबानीच्या छोट्या मुलाच्या लग्नाआधी प्री वेडिंग सोहळ्यासाठी जगभरातीन कानाकोपऱ्यातून पाहुणे बोलावण्यात आले होते. मग ते बिझनेस क्षेत्रातील फेसबुक मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग अथवा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स. जामनगरमध्ये केवळ तीन दिवसांत साडे तीनशे विमानांची ये जा झाली. देशाचे उद्योगपती अडानींपासून ते पिरामलपर्यंत बिर्ला पासून ते टाटा यांच्या पर्यंत प्रत्येक मोठ्या उद्योगपतीच्या घराण्याची मंडळी पाहुणे म्हणून अनंत आणि राधिकाला आशिर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.
बॉलिवूडबाबत बोलायचे झाल्यास जामनगरमध्ये तर कलाकार मंडळीच अवतरली होती. असा फार क्वचित कोणीतही सेलिब्रेटी असेल जो या सोहळ्यासाठी आला नसेल. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पासून ते सुपरस्टार रजनीकांत सारखे दिग्गज सेलिब्रेटी यासोहळ्यासाठी आले होते.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…