Tuesday, July 9, 2024
HomeदेशBanglore Blast : बंगळुरु स्फोट प्रकरणी चार आरोपी ताब्यात!

Banglore Blast : बंगळुरु स्फोट प्रकरणी चार आरोपी ताब्यात!

मंगळुरूतील स्फोटही या स्फोटासारखाच! उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा दावा

बंगळुरू : बंगळुरूतील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameshwaram cafe) दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटाविषयी (Banglore bomb blast) मोठी अपडेट समोर आली आहे. या स्फोटप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून, लवकरच या प्रकरणाचे धागेदोरे सापडतील, असा विश्वास बंगळुरूचे आयुक्त बी. दयानंद यांनी व्यक्त केला.

रामेश्वरम कॅफेत शुक्रवारी ‘आयईडी’ असलेल्या पिशवीचा स्फोट होऊन नऊ जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्यानुसार गुन्हा नोंदवून बेंगळुरू, धारवाड, हुबळी येथून चौघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाच्या तपासासाठी अनेक पथके स्थापन करण्यात आल्याचे आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले.

स्फोट प्रकरणात काल रामेश्वरम कॅफेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित आरोपी दिसून आला होता. त्याने टोपी आणि मास्क लावला होता व हातात आयईडी स्फोटकांनी भरलेली बॅग घेऊन तो कॅफेमध्ये येत होता. त्याने कॅफेत रवा इडलीची ऑर्डर दिली आणि नाश्ता घेतल्यानंतर तो बॅग तिथेच सोडून निघून गेला. या प्रकरणी पोलिसांचा सखोल तपास सुरु आहे.

मंगळुरूतील स्फोटही या स्फोटासारखाच!

मंगळुरूतील कुकर स्फोट आणि बेंगळुरू कॅफे स्फोट यांच्यात साम्य असल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. या दोन स्फोटांसाठी वापरलेले साहित्य, टायमर आणि अन्य बाबी सारख्याच असल्याचे पोलिसांचे म्हणणे असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. मंगळुरू आणि शिवमोगा येथील पोलीस अधिकारीही बेंगळुरूमध्ये आले असून, संयुक्त तपास सुरू असल्याचे शिवकुमार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -