Chandrakant Patil : ...तर त्या विद्यापीठांची मान्यता काढून घेणार!

चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा


नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आनंदशाळा समारंभाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते झाले उद्घाटन करण्यात आले. केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण संस्थाचालकांना एक इशारा दिला. नवीन शैक्षणिक धोरणाची (New Education Policy) जूनपासून जे अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेणार, असं ते म्हणाले. तुम्ही सुधरा, दम देत नाही पण प्रेमाचा सल्ला समजा, असंही त्यांनी म्हटलं आहे.



सुधरा नाहीतर कॉलेजेस बंद करा


चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यात फ्लेम युनिव्हर्सिटीत १३ लाख वार्षिक फी आहे, ऍडमिशन मिळत नाही तिथे माझ्यासारख्याची चिट्ठी द्यावी लागते, ऐकत नाहीत. मालक शहा माझे मित्र आहेत. त्यांनी १०० एकरात ८०० कोटी रुपये खर्च केले आहे. मुलींना मोफत शिक्षणाबाबत कॅबिनेट निर्णय झाला आहे. आता जी आर निघेल. तुम्ही सुधरा, सुधारा नाही म्हणत सुधरा म्हणतोय जरा ग्रामीण भागातला शब्द आहे. सुधरा नाहीतर कॉलेजेस बंद करा, असं त्यांनी म्हटलं.



त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेईल


पुढे ते म्हणाले, जूनमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाला पर्याय नाही. ज्यांना या धोरणाची जूनपासून अंमलबजावणी करायची नसेल त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ज्या विद्यापीठाला ममता बॅनर्जींसारखे बंड वाटत असेल, आम्ही करणार नाही, अशी त्यांची भूमिका असेल तर त्या विद्यापीठाची मान्यता रद्द होईल. आम्ही दम देत नाही, प्रेमाचा ग्रामीण तरुण म्हणून सल्ला देतोय, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

शेतकरी कर्जमाफी योजनेत आणखी २३ लाख शेतकरी पात्र, निकषांत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; नियमित कर्ज परतफेडीची अटही शिथिल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत

Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक संपन्न ! शेतकऱ्यांपासून ते परिवहन मंडळापर्यंत सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय

Cabinet meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (१४ जुलै) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक

Vegetable Price Hike : पावसाचा फटका! राज्यात भाजीपाल्याचे दर दुप्पट; सर्वसामान्यांच्या खिशाला बसली कात्री

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात आवक

Beed Cyber Crime : IT इंजिनिअरच ठरला सायबर क्राईमची शिकार; ‘SEBI’चे बनावट प्रमाणपत्र पाठवून IT इंजिनियरची लाखोंची फसवणूक

बीड : बीड जिल्ह्यात सायबर फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तंत्रज्ञानाची चांगली माहिती असलेल्या

Chembur News: चेंबूर वृक्ष दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय; कंत्राटदारांना दंड, झाडांच्या सुरक्षेसाठी नवी SOP लागू होणार

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी

Jalgaon Accident : संसाराची नवी स्वप्न धुळीस! लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

माहेरी जाताना २१ वर्षीय नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात