Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Samruddhi Mahamarg : समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख ठरली!

Samruddhi Mahamarg : समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख ठरली!

कसा असणार तिसरा टप्पा?


मुंबई : समृध्दी महामार्ग (Samruddhi Mahamarg) हा महाराष्ट्र शासनाचा (Maharashtra Government) एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अaसा प्रकल्प आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या (Inauguration) सर्वजण प्रतिक्षेत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख ठरली असून ४ मार्चला या त्याचे उद्घाटन होणार आहे.


महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) ते उपराजधानी नागपूर (Nagpur) या दरम्यान हा महामार्ग तयार होत असून आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. तर तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन ४ मार्च रोजी होणार आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेलं असून आता भरवीर ते इगतपुरी असा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. हा २३ किलोमीटरचा टप्पा आहे. हा टप्पा ४ मार्च पासून वापरात येणार असल्याची माहिती आहे.

समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर लांबीचा असून डिसेंबर २०२२ मध्ये त्यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी ५२० किमीचा महामार्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर शिर्डी ते भरवीर पर्यंत हा महामार्ग सुरू करून एकूण ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सुरू आहे.
Comments
Add Comment