T20 World Cup: वर्ल्डकपसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? तारीख ठेवा लिहून

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४साठी(t-20 world cup 2024) टीम इंडियाची(team india) घोषणा कधी होणार? याबाबत अनेक चाहते उत्सुक आहेत. यावेळेस वर्ल्डकपचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत आहे. भारतीय संघाने आपल्या अभियानाची सुरूवात ५ जूनला आयर्लंडविरुद्ध करणार आहे तर दुसऱ्याच सामन्यात ९ जूनला ते पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळतील.


भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकपचा खिताब जिंकन ११ वर्षे झाली आहेत. अशातच भारतीय संघ हा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेची सुरूवात १ जूनपासून होईल.


बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार टी-२० वर्ल्डकप २०२४साठी भारतीय संघाची घोषणा १ मेला होऊ शकते.दरम्यान, वर्ल्डकपसाठी संघ घोषणेची शेवटची तारीख काय आहे याबाबत आयसीसीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.


रिपोर्टनुसार १५ सदस्यीय संघाच्या घोषणेची तारीख १ मे असू शकते. २५ मे पर्यंत संघात बदल करण्याची वेळ दिली जाईल. दरम्यान, यासाठी आयसीसीच्या टेक्निकल कमिटीकडून अप्रूव्हल घ्यावे लागते.



बीसीसीआय सचिव जय शाह यांना ट्रॉफी जिंकण्याची आशा


बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच म्हटले होते की मला आशा आहे की भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात यावेळेस वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी ठरतील. जय शाह यांनी इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या कार्यक्रमात म्हटले होते, आम्ही २०२३च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भले हरलो असलो तरी सलग १० सामने जिंकत प्रेक्षकांची मने जिंकली. मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही २०२४ टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृ्तवात बारबाडोसमध्ये भारताचा झेंडा रोवणार.

Comments
Add Comment

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०