Monday, May 12, 2025

महामुंबईमहाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

Shivsena Shinde Group : विधीमंडळाच्या लॉबीत दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की!

Shivsena Shinde Group : विधीमंडळाच्या लॉबीत दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की!

शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा राडा


मुंबई : विधीमंडळाच्या लॉबीत आज शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची (Shinde Group MLA Fight) झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. यानंतर शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिवसेनेचे आमदार त्यांच्यासोबत होते. त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले, त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.



कोणताही राडा झाला नाही : शंभुराज देसाई


दरम्यान, शंभूराज देसाई यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, कोणताही राडा झालेला नाही. काय पुरावा आहे? मी माध्यमांना प्रश्न विचारतो, लॉबीमध्ये माध्यमांचा कुठला कॅमेरा नाही. तरी तुम्ही कसे चालवता, असं शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे. एक मंत्री आणि आमदार चर्चा करत होते. चर्चा करताना फक्त आवाज वाढला. संबंधित आमदारांना आम्ही लॉबीमध्ये घेऊन चर्चा केली. वाद झाला नाही, कुणी भिडले नाही. बोलता बोलता मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का, असा सवाल शंभुराज देसाईंनी विचारला आहे.

Comments
Add Comment