Tuesday, November 12, 2024
Homeताज्या घडामोडीSai Tamhankar : सई ताम्हणकर झळकणार हिंदी वेबसिरीज 'डब्बा कार्टेल'मध्ये!

Sai Tamhankar : सई ताम्हणकर झळकणार हिंदी वेबसिरीज ‘डब्बा कार्टेल’मध्ये!

मिमी, भक्षकनंतर पुन्हा एकदा गाजवणार बॉलिवूड

मुंबई : मराठमोळी ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कॉमेडी शोच्या माध्यमातून जजच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. मात्र, त्यासोबतच सईची चित्रपटसृष्टीत देखील अनेक कामे सुरु आहेत. नुकताच तिचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा मराठी चित्रपट आला होता. यानंतर आता सई एका हिंदी वेबसिरीजमधून (Hindi Webseries) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर (Netflix) ‘डब्बा कार्टेल’ (Dabba Cartel) ही नवी वेबसिरीज येणार आहे, ज्यात सई अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) नेटफ्लिक्सवर एक नवीकोरी वेब सीरिज घेऊन येत आहे. त्याच्या या सीरिजचं नाव ‘डब्बा कार्टेल’ असून अलीकडेच याची पहिली झलक समोर आली आहे. यामध्ये मराठीमोळी सई ताम्हणकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘भक्षक’ पाठोपाठ आणखी एक सीरिज प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याने सध्या २०२४ हे वर्ष तिच्यासाठी सर्वार्थाने खास ठरत असल्याचं बोललं जात आहे.

ड्रग्जचा अवैध व्यापार यावर आधारित या सीरिजचं कथानक असणार आहे. सईसह अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशा अनेक बड्या कलाकारांची फौज या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. सीरिजची पहिली झलक शेअर करत सई लिहिते, “हा असा डबा आहे की, ज्याला तुम्ही कधीही विसरू शकत नाही.” दरम्यान, ही सीरिज नेटफ्लिक्सवर कधीपासून पाहता येणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

सईने याआधीही बॉलिवूड गाजवलं आहे. सई ‘मिमी’ चित्रपटात क्रिती सॅननच्या खास मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेचे फार कौतुक झाले होते. त्यानंतर ती भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेल्या ‘भक्षक’ सिनेमातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. यानंतर आता ‘डब्बा कार्टेल’मध्ये सईचं काम पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -