
डिंडोरी : मध्य प्रदेशच्या डिंडोरी येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे बिछिया-बूडझर गावात एक भीषण अपघात झाला आहे. या परिसरात पिकअप व्हॅनचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले हे लोक एका कार्यक्रमात सामील झाल्यानंतर परतत होते. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर शाहपुरा सामूहिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बिछिया चौकाजवळ झाला. या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. यात ९ पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तर २१ जण जखमी झाले.
मृतांमध्ये मदनसिंह (४५ वर्ष, निवासी अम्हाइ देवरी), पीतम ( १६ वर्ष निवासी पोंडी माल), पुन्नू लाल ( ५५ वर्ष, अम्हाइ देवरी), महदी बाई ( ३५ वर्ष सजानिया जिला उमरिया), सेम बाई (४० वर्ष अम्हाइ देवरी), लालसिंह ( ५५ वर्ष अम्हाइ देवरी), मुलिया (६० वर्ष अम्हाइ देवरी), तितरी बाई (५० वर्ष निवासी धमनी जिला उमरिया), सावित्री (५५ वर्ष पोंडी जिला उमरिया), सरजू ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी), सम्हर ( ५५ वर्ष पोंडी), महासिंह ( ७२ वर्ष पोंडी), लालसिंह ( २७ वर्ष पोंडी) किरपाल ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी) यांचा समावेश आहे.