मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या सेलिब्रिटींची लहान मुलं फारच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी आलिया व रणबीरने (Alia and Ranbir) राहा कपूरला (Raha Kapoor) माध्यमांसमोर आणले. तर नुकतेच अनुष्का-विराटने (Anushka Sharma And Virat Kohli) अकाय (Akaay) नावाच्या मुलाला जन्म दिला. ट्वेल्थ फेल (Twelth fail) सिनेमामुळे चर्चेत आलेला अभिनेता विक्रांत मेस्सीदेखील (Vikrant Messy) नुकताच बाबा झाला आहे. तर रिचा चड्ढा आणि अलीफजल (Richa Chaddha & Alifazal) देखील आपल्या बाळाची प्रतिक्षा करत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची फेव्हरेट जोडी ‘दीपवीर’ (Deepveer) म्हणजेच दीपिका पादुकोण (Deepika Padukone & Ranveer Singh) आणि रणवीर सिंग यांच्या घरी नव्या बाळाचे आगमन होणार असल्याची चर्चा होती. या चर्चेला आता पुष्टी मिळाली असून दीपवीरने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.
दीपिका व रणवीरने बाळाच्या गोष्टींनी सजावट केलेलं एक पोस्टर शेअर करत त्यात ‘सप्टेंबर २०२४’ (September 2024) असं लिहिलं आहे. म्हणजे दीपिका आणि रणवीरच्या घरी सप्टेंबर महिन्यात नव्या बाळाचे आगमन होणार आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक चाहते ही बातमी ऐकण्यासाठी आतुरले होते, त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
काही दिवसांपूर्वी ‘बाफ्ता इव्हेंट’मधील (BAFTA Event) दीपिकाचा लूक चर्चेत आला होता. यामध्ये तिने गोल्डन रंगाची सुंदर शिमरी साडी परिधान केली होती. यात ती बेबी बंप लपवत असल्याचा चाहत्यांचा अंदाज होता. त्यामुळे दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा सुरु झाली. शिवाय ‘द वीक’च्या रिपोर्टनेही दीपिका गरोदर असल्याच्या चर्चांना पुष्टी दिली होती. मात्र, दीपवीरकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. आता खुद्द दीपवीरनेच नव्या बाळाच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितल्याने लवकरच ‘कुणीतरी येणार येणार गं!’ हे पक्के झाले आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…