Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

Anant - Radhika Pre-Wedding : अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्याची सुरुवात अन्नदानाने

Anant - Radhika Pre-Wedding : अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्याची सुरुवात अन्नदानाने

अंबानी कुटुंब करणार ५१ हजार लोकांना अन्नदान


जामनगर : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा आणि उद्योगपती अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनची सुरुवात अन्नदानाने झाली. अंबानी कुटुंबाचे होमटाऊन असलेल्या जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसह अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनी गावकऱ्यांना पारंपारिक गुजराती जेवण दिले. राधिकाची आजी आणि आई-वडील वीरेन आणि शैला मर्चंट यांनी देखील अन्नसेवेत (Food donation) भाग घेतला.


अन्नदानाच्या कार्यक्रमात सुमारे ५१ हजार स्थानिक रहिवाशांना जेवण दिले जाणार आहे. पुढील काही दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यांसाठी स्थानिक समुदायाचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी कुटुंबाने अन्नसेवा आयोजित केली आहे. भोजनानंतर उपस्थितांनी पारंपरिक लोकसंगीताचा आस्वाद घेतला. सुप्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमात रंगत आणली.


अन्नदान कार्यक्रमात राधिका आणि अनंत यांना गावकऱ्यांकडून खूप आशीर्वाद मिळाले. लोकांनी त्याला भेटवस्तूही दिल्या. त्याचवेळी अनंत आणि राधिका यांनीही सर्वांचे मोकळेपणाने स्वागत केले. हात जोडून प्रणाम केला आणि स्वतःच्या हाताने जेवणही दिले.



अंबानी कुटुंबात अन्नदानाची जुनी परंपरा


अंबानी कुटुंबात जेवण देण्याची परंपरा जुनी आहे. अंबानी कुटुंब शुभ कौटुंबिक प्रसंगी भोजन देते. कोरोना महामारीच्या काळात देश संकटात असतानाही अनंत अंबानी यांच्या आई नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनने जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम राबवला. कौटुंबिक परंपरेला पुढे नेत अनंत अंबानी यांनी त्यांच्या लग्नाआधीची कार्ये अण्णा सेवेसोबत सुरू केली आहेत.

Comments
Add Comment