Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीShreyas Talpade : श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' चित्रपटाच्या तिकीटावर एक खास...

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटाच्या तिकीटावर एक खास ऑफर!

उद्यापासून होणार सर्वत्र प्रदर्शित

मुंबई : महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hee Anokhi Gath) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे नुकताच हृदयविकाराच्या झटक्यातून सावरलेला अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडीला गौरी इंगवले (Gauri Ingawale) प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या तिकीटावर एक खास ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका तिकीटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे.

‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटामधून गौरी आणि श्रेयसची नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भन्नाट ऑफरही जाहीर केली आहे. १ मार्चला एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर असणार आहे.

बूक माय शोवर HEAGBOGO हा कूपन कोड वापरुन तुम्ही ही ऑफर वापरु शकता. आपल्या माणसांच्या सोबतीने पाहा, ‘ही अनोखी गाठ’ ची प्रेक्षकांना १ वर १ फ्री ची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात शरद पोंक्षे, रिषी सक्सेना, दीप्ती लेले, सुरभी भावे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या तिकीटावरील ऑफर फक्त १ मार्च या दिवशीच लागू असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -