बॉल काढण्याच्या नादात जीव गमावला, छतावरून पडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Share

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळ मैदानावर खेळत असताना छतावरील बॉल काढण्याच्या नादात छतावरून पडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुजल मोरे असं या मुलाचे नाव होते. तो दहावीत शिकत होता. खेळत असताना बॉल छतावर गेला होता. बॉल घेण्यासाठी तो छतावर गेला होता. दरम्यान तोल घसरून मुलगा पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सुजल बीडीडी चाळीजवळील एका मैदानात क्रिकेट खेळत होता. खेळता खेळता आंबेडकर भवन येथील इमारतीच्या छतावर चेंडू पडला. बॉल आणण्यासाठी छतावर जाण्यासाठी मुलांनी सुजलला वर पाठवले होते. मुलाने वर जाण्यासाठी शिडी वापरली. छतावर चढला. परंतु उतरताना त्याचा पाय केबलमध्ये अडकला आणि तोल गेल्यामुळे तो थेट ३५ फुट खाली पडला.

खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून नाकातून रक्ताच्या थारोळ्या चालू झाल्या. मुलांनी आरडाओरड करत सुजलच्या पालकांना माहिती दिली. त्यांनी लगेच त्याला जवळच्या रुग्णलयात दाखल केले. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. त्यानंतर एक दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

10 minutes ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

35 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

43 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

1 hour ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

2 hours ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

2 hours ago