Mumbai Water cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

१ मार्चपासून १० टक्के पाणीकपात होण्याची शक्यता


मुंबई : मार्च महिन्यापासून मुंबईकरांना (Mumbaikars) १० टक्के पाणीकपातीला (Water cut) सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ ४३ टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत मुंबई महापालिकेच्या जलखात्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर आयुक्तांकडून शिक्कामोर्तब झाल्यास ऐन उन्हाळ्याच मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.


पालिका आयुक्तांकडून अद्याप प्रस्तावावर निर्णय देण्यात आलेला नाही. उन्हाळ्यात मुंबईतला पाणीपुरवठा अपुरा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने (BMC) राज्य सरकारकडे (Maharashtra Government) पत्राद्वारे केली होती. यासंबंधी २९ फेब्रुवारी पर्यंत उत्तर कळवण्याची विनंती केली होती. मात्र, याबाबत अद्याप जलसंधारण खात्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही, त्यामुळे जलखात्याकडून इतर पर्यायी मार्गांचा शोध सुरु आहे.



तीन वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा


एखाद्या वर्षी पाणीसाठा कमी झाला तर राखीव साठ्यातून पाणी मिळावे याकरीता पालिका प्रशासन मे महिन्याच्या आसपास राज्य सरकारला पत्र पाठवते. यंदा मात्र ही वेळ मार्च महिन्यातच आली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून केवळ ४३ टक्के पाणीसाठा उरला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये तो ५४.४१ टक्के इतका होता तर २०२२ मध्ये ५६.८६ टक्के इतका होता. यंदा ही टक्केवारी फारच खाली घसरली आहे.


Comments
Add Comment

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व