निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी!

  74

मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार


मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.


मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले.


त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत

यंदा १.५ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

मुंबई : यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी

ऑगस्ट अखेरीस जरांगे आणि हाके मुंबईत आमनेसामने ?

मुंबई : केंद्र सरकारने जनगणना करताना प्रत्येक व्यक्तीची जातीची माहिती घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.