Friday, July 12, 2024
Homeक्रीडाBCCI: बीसीसीआयकडून इशान किशन,श्रेयस अय्यरला जोरदार झटका

BCCI: बीसीसीआयकडून इशान किशन,श्रेयस अय्यरला जोरदार झटका

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रक्टची घोषणा केली आहे. यात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना जोरदार झटका बसला आहे. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंची यादी(ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत)

ग्रेड ए+

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा

ग्रेड ए

आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या.

ग्रेड बी

सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षऱ पटेल आणि यशस्वी जायसवाल

ग्रेड सी

रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

आकाश दीप, विजय कुमार विशाक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वत कावेरप्पा यांना फास्ट बॉलिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील करण्यात आले आहे.

 

या खेळाडूंची सुट्टी

याआधी कॉन्ट्रॅक्टमध्ये श्रेयसला ग्रेड बी आणि इशानला ग्रेड सीमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा श्रेयसला वार्षिक ३ तर इशानला १ कोटी मिळत होते. मात्र आता त्यांचे इतक्या कोटींचे नुकसान झाले आहे. या दोघांशिवाय ए ग्रेडमधून ऋषभ पंत, अक्षऱ पटेल यांचेही नुकसान झाले आहे. बी कॅटेगरीमधून चेतेश्वर पुजाराला बाहेर करण्यात आले आहे. सी कॅटेगरीमधून उमेश यादव, शिखर धवन, दीपक हुड्डा आणि युझवेंद्र चहल यांची सुट्टी झाली आहे.

कोणत्या कॅटेगरीमध्ये किती मिळतात पैसे?

बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ४ कॅटेगरी असतात. एप्लस कॅटेगरीमध्ये वर्षाला ७ कोटी, ए कॅटेगरीमध्ये ५ कोटी, बी कॅटेगरीमध्ये ३ आणि सगळ्यात खालची सी कॅटेगरीमध्ये वर्षाला १ कोटी रूपये मिळतात. या सर्व कॅटेगरीमधील खेळाडू सामील करण्याचे काही नियमही आहे. एप्लस कॅटेगरीमधील खेळाडू तीनही कसोटी, वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -