Savingsचा जबरदस्त फॉर्म्युला, फॉलो करा ५०:३०:२०चा नियम

मुंबई: लोकांचा पगार झाला की तो कधी संपतो हे कळतच नाही. महिना अखेरीसपर्यंत खिशा पूर्ण रिकामा झालेला असतो. अशातच नोकरीपेशा लोकांसाठी बचत करणे कठीण होते.


तुम्ही ५०:३०:२०चा नियम वापरून भविष्यासाठी काही बचत करू शकता. ५०:३०:२०नियामाची सुरूवात अमेरिकेच्या सीनेट एलिझाबेथ वॉरेन यांनी केली होती.


त्यांनी आपला पगार तीन भागांमध्ये विभागला. यात गरज, इच्छा आणि बचत असे तीन भाग केले.


कमाईतील ५० टक्के भाग गरजेच्या कामांवर खर्च केला पाहिजे. कमाईतील ३० टक्के भाग आपल्या आवडीच्या वस्तूंवर खर्च करा. हे खर्च असे असतात जे टाळलेही जाऊ शकतात.


कमाईतील २० टक्के भाग बचतीसाठी राखीव ठेवला गेला पाहिजे. या फॉर्म्युल्यानुसार राहिले तर आपली बचतही होईल आणि भविष्यात पैशांची चणचण भासणार नाही.


नाहीतर अनेकदा लोक खर्चाच्या नावाने बचतच होत नाही अशी बोंब करत असतात. मात्र त्यांचे याकडे लक्ष नसते की वायफळ गोष्टींवरील खर्च आपला कमी केला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

Health: वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांनी फिट राहण्यासाठी जरूर खा या ७ गोष्टी

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेक पुरुषांना चाळीशीनंतर आरोग्याच्या अनेक

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे