Interim Budget : अर्थसंकल्पावरुन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केले लक्ष्य

'निवडणूक बजेट' या उद्धव ठाकरेंच्या टीकेला दिले चोख प्रत्युत्तर


मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Legislative Budget session) दुसर्‍या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आहे. यावर 'निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे' अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिघांनीही टोले लगावले आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर, पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवारांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे हे अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक करत होते. त्यावेळी माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारुन, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक बजेट आहे, असं म्हटल्याचं सांगितलं. त्यावर मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत असताना, अजित पवार मध्येच आले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली.


अजित पवार म्हणाले, 'मी ज्यावेळी त्यांच्या (उद्धव ठाकरेंच्या) सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी अर्थसंकल्प मांडल्यानंतर फार छान आहे, फार छान आहे म्हणायचे, आता मी इकडे आहे म्हणून असं म्हणतात, त्याला काय अर्थ आहे? अशी टीका अजित पवारांनी केली.


यानंतर लगेचच बाजूला उभे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "उद्धव ठाकरेंनी यापू्र्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं, मला अर्थसंकल्प कळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं" असा टोला त्यांनी लगावला.


एकनाथ शिंदे यांनीही 'विरोधकांकडे बोलण्याचे मुद्दे नाहीत, निवडणुका आहेत म्हणून बजेट मांडायचं नाही का?', असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंना चपराक लगावली.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक