मुंबई: टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सगळ्यात वेगवान शतकाचा जुना रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. आता नवा रेकॉर्ड २२ वर्षीय नामिबियाचा फलंदाज जॉन निकोल लॉफ्टी इटनच्या नावावर झाला आहे. आपल्या १०१ धावांच्या खेळीदरम्यान जॉन लॉफ्टीने ३६ बॉलचा सामना केला. यात त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले.
जॉन निकोल लॉफ्टी इटनने केवळ ३३ बॉलमध्ये रेकॉर्ड आपल्या नावावर केला. ३३ बॉलमध्ये टी-२० शतक ठोकताच नेपाळच्या कुशल मल्लाचा मागील रेकॉर्ड उद्ध्वस्त केला. खास बाब म्हणजे निकोलने नेपाळी संघाविरुद्ध हा मोठा रेकॉर्ड केला.
नेपाल ट्राय नेशन टी-२० आंतरराष्ट्रीय सीरिजअंतर्गत नामिबिया आणि नेपाळ यांच्यात हा टी-२० सामना आज २७ फेब्रुवारीला कीर्तीपूरमधील त्रिभुवन युनिर्व्हसिटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात खेळवण्यात आले. जॉन लॉफ्टी इटनच्या शतकाच्या जोरावर नामिबियाने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत ४ बाद २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाला हार पत्करावी लागली.
जेव्हा हा रेकॉर्ड लॉफ्टी इटनने तोडला तेव्हा कुशल मल्लाही मैदानात होता. कुशलने २०२३मध्ये आशियाई गेम्समध्ये मंगोलियाविरुद्ध ३४ बॉलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकले होते.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…