Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीRaj Thackeray : छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला!

Raj Thackeray : छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला!

जोरदार टोला लगावत राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Cogress Party) व घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार’ हे नाव व ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आले. या चिन्हाचे अनावरण व प्रचार करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) आज स्वतः रायगडावर पोहोचले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवारांना जोरदार टोला लगावला. ‘छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला!’, असं राज ठाकरे म्हणाले. डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडील महापुरुष हे आपण जातीत विभागून टाकले आहेत. या महापुरुषांवरच राजकारण सध्या आता सुरू आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचे नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला. असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

पुढे राज ठाकरे म्हणाले, ठाण्यात जाहीर सभेत मी सांगितलं होतं, त्यांची मुलाखत मी घेतली होती. तेव्हाही त्यांना प्रश्न विचारला होता की, तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर सर्व बोलता पण छत्रपतींचे नाव कधी घेत नाही. शिवछत्रपतींचे नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना फुंकू दे असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -