मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेना नेते, प्रिंसिपल मनोहर जोशी यांचे निधन दु:खदायक आहे. शिवसेनेच्या स्थापने पासून आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे सहकारी, शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते अशी त्यांची ओळख होती. मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक पदापासून देशाच्या सर्वोच्च संसदेच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. सरांच्या जाण्यामुळे साहेबांच्या शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासाचा साक्षीदार पडद्याआड झाला असल्याची शोकाकुल श्रद्धांजली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाहिली आहे.
जोशी यांच्या दादर येथील निवासस्थानी जाऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
जोशी सरांनी राजकारणासोबतच उद्योग व्यवसायामध्ये चांगला जम बसविला होता. त्यांच्या कोहिनूर उद्योग समुहाचे नाव आजही प्रसिध्द आहे. मराठी मुलांना व्यावसायिक कौशल्य शिकविण्याचे त्यांचे वर्ग प्रसिध्द होते. ईश्वर सरांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख झेलण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केली.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…