मुंबई : धारावीत लँड जिहादच्या नावाने मस्ती करणाऱ्या जिहाद्यांना ठिक करण्याचे काम पोलीस आणि महापालिका प्रशासनाने आठ दिवसात करावे, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. आठ दिवसांनंतर हिंदुना त्रास देण्याचे काम सुरूच राहिल्यास आम्ही तिसरा डोळा खोलून जिहाद्यांना तांडव काय असते ते दाखवू, असा इशारा राणे यांनी दिला.
हिंदू कुटुंबियांना जिहादींकडून घरात घुसून झालेल्या मारहाण प्रकरणातील कुटुंबियांची राणे यांनी आज धारावीत जाऊन भेट घेतली. यानंतर त्यांनी येथील मंदिरात महाआरती केली. यानंतर उपस्थितांशी राणे यांनी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, ज्या जखमा माझ्या हिंदू बहिणींच्या अंगावर जिहाद्यांनी दिल्या आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी. धारावीतील हिंदूंकडे पुन्हा कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास आम्ही तांडव करू, मग येथील परिस्थिती पोलिसांच्याही हातात राहणार नाही, असेही राणे म्हणाले.
पोलीस आणि महापालिका प्रशासनाने लक्षात ठेवावे की, राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. तुम्हाला आम्ही मेडल देणार आहोत, ना की जिहादी देणार आहेत, असे राणे म्हणाले.
जिहादींचे लाड करण्यापेक्षा येथील हिंदुंना सुरक्षित ठेवा, असे आवाहन राणे यांनी पोलिसांना केले. जिहादींनी येथे अनधिकृतपणे मस्जिद, मदरसे बांधण्यापेक्षा थेट पाकिस्तानात जावे, उगाच हिंदूंना मुंबईत ताकद दाखवायला लावू नका, आम्ही आमच्या ताकदीवर उतरलो तर तुम्हाला तुमचे घर ही आठवणीत राहणार नाही, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…