Pandharinath Phadke : बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीनाथ फडके यांचं निधन

पनवेल : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे (Bullockcart Association) अध्यक्ष आणि 'गोल्डमॅन' (Goldman) अशी ओळख असलेले पंढरीनाथ फडके (Pandharinath Phadke) यांचे आज निधन झाले. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी ऑफिस वरून घरी जाताना एक-दीडच्या सुमारास कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पंढरीशेठ यांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. महाराष्ट्रात कुठेही बैलगाडा शर्यत असेल तर त्या ठिकाणी ते हजर असायचे. तसेच शर्यतीत जिंकलेले ४० हून अधिक बैल त्यांच्याकडे होते. सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर ती परत सुरू करावी यासाठी पंढरीनाथ फडके यांनी प्रयत्न केले होते.


१९९६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती. शर्यतीत जिंकणाऱ्या बैलावर पंढरीनाथ फडके यांची नजर असायची. मग तो बैल कितीही किंमत लागली तरी ते विकत घ्यायचे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल ११ लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. त्यावरून त्यांना बैलगाडा शर्यतीची आणि बैलांची किती आवड होती हे लक्षात येतं. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील