मुंबई: यशस्वी जायसवालने(yashaswi jaiswal) कसोटी रँकिंगमध्ये मोठी उडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सलग दोन शतके ठोकणाऱ्या जायसवालने रँकिंगमध्ये १४ स्थानांनी झेप घेतली आहे. यासोबतच तो १५व्या स्थानावर पोहोचला आहे. यासोबतच वनडे रँकिंगमध्ये तीन भारतीय खेळाडू टॉप ५मध्ये आले आहेत. यात शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे.
कसोटी आणि वनडे दोन्ही रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांना फायदा झाला आहे. जायसवालने इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटीच्या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात दुहेरी शतक ठोकले होते. विशाखापट्टणममध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने पहिल्या डावात जायसवालने बॅटिंग करताना २०९ धावा केल्या होत्या. यानंतर राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात बॅटिंग करताना नाबाद २१४ धावा केल्या होत्या.
याशिवाय हैदराबादमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही जायसवालने ८० धावांची खेळी केली होती. तर कसोटी रँकिंगमध्ये टॉप ५ बद्दल बोलायचे झाल्यास न्यूझीलंडचा केन विल्यमसन्स ८९३ रेटिंगसोबत अव्वल स्थानावर आहे. याशिवाय स्टीव्ह स्मिथ ८१८ रेटिंगसोबत दुसऱ्या, डेरिल मिचेल ७८० रेटिंगसह तिसऱ्या, बाबर आझम ७६८ रेटिंगसह चौथ्या आणि इंग्लंडचा ज्यो रूट ७६६ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.
वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांची कमाल
वनडे रँकिंगमध्ये भारताचा सलामीवीर शुभमन दिल ८०१ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर, विराट कोहली ७६८ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आणि रोहित शर्मा ७४६ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. यादीत न्यूझीलंडचा डेरिल मिचेल ७२८ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. तर वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. बाबर ८२४ रेटिंगसह वनडेच पहिल्या स्थानावर आहे.