बिहारमध्ये भीषण रस्ते अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू

पाटणा: बिहारच्या(bihar) लखीसराय येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे घडलेल्या भीषण रस्ते अपघातात(road accident) ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामगढचौक ठाणे क्षेत्रातील बिहरौरा गावातील घटना. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला.


येथे १५ लोक ऑटोमून जात होते. त्याचवेळेस अज्ञात वाहनाने या ऑटोला टक्कर दिली. या घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ७ जण जखमी झाले. आसपासच्या लोकांनी ही सूटना पोलिसांना दिली.


या घटनेची सूचना आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले. जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. मृत तसेच जखमी व्यक्तींची ओळख पटलेली नाही.

Comments
Add Comment

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोड नवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

जवाद सिद्दिकीला १३ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली :  दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना