सिडको :अंबड पोलिस ठाण्यातच स्वतःच्या कॅबीन मध्ये मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अशोक नजन ( वय ४० ) यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करण्याचे अधिकृत कारण समजले नसले तरी कौटुंबिक तणावातून हे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .नजन हे सकाळी घरून कार्यालयात आले होते .बराच वेळ उलटून गेल्यानंतर देखील ते केबिनच्या बाहेर आले नाहीत म्हणून सहकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ही दुर्दैवी घटना लक्षात आली.
अंत्यत शांत संयमी म्हणून ओळख असलेल्या नजन यांच्या या दुर्दैवी पावलावर हळ हळ व्यक्त होत असून घटनेचे वृत्त कळताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली.