मुंबई: आजकालच्या खराब लाईफस्टाईलमुळे केसांचे गळणे(hair fall) ही सामान्य गोष्ट बनली आहे. कमी वयातच अनेकांचे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. आरोग्य तज्ञांच्या मते वय वाढण्यासोबतच केसांची लांबी तसेच प्रमाण कमी होऊ लागते. केसांचे गळहे हे वय वाढणे, जेनेटिक आणि हार्मोन्समधील बदलामुळे होऊ शकते मात्र त्रास तेव्हा वाढतो जेव्हा कमी वयात केस वेगाने गळू लागतात.
अशातच काही योग्य उपाय करून ही केसगळती रोखता येऊ शकते. अधिकतर केस गळणे ही स्काल्पची समस्या असू शकते. मात्र अनेकदा इतर कारणेही असतात.
तज्ञांच्या मते फिजीकल आणि मेंटल दोन्ही प्रकारचे आजार केसांच्या गळतीचे कारण बनू शकतात. ल्यूपस, सिफलिस, थायरॉईड, सेक्स हार्मोनमधील असंतुलन अथवा पोषणसंबंधी समस्येमुळे केस वेगाने गळतात. याशिवाय प्रोटीन, आर्यन, झिंक यांच्या कमतरतेमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
अधिक तणाव अथवा डिप्रेशन असल्यासही केसांची समस्या उद्भवते. अशा लोकांमध्ये केस गळतीचे प्रमाण अधिक असते. जेव्हा आपण ताण घेतो तेव्हा स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल रिलीज होते. हे केसांच्या विकासासाठी गरजेच्या पेशींना नुकसान पोहोचवते. यामुळे केस कमकुवत होतात तसेच तुटण्याचा धोकाही वाढतो.
ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांचेही केस गळू शकतात. हायपर अथवा हायपोथायरॉईडिज्म या दोन्ही स्थिती केस गळण्याची समस्या होते.
केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी पोषकतत्वांची आवश्यकता असते. रायबोफ्लेविन, बायोटिन, फोलेट आणि व्हिटामिन बी१२ आणि व्हिटामिन ई केस गळती रोखू शकतात. जेवणात झिंक प्रोटीनसारखी पोषकत्वांची कमतरता असल्यास केस गळतात.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…