MNS BJP Alliance : राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात शिवतीर्थावर तब्बल एक तास चर्चा

हे मनसे-भाजप युतीचे संकेत?


मुंबई : मागील काही महिन्यांपासून भाजपा (BJP) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर अनेक रणनिती आखताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) पक्षातले अनेक बडे बडे नेते भाजपमध्ये समाविष्ट झाल्याने काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यातच आता मनसेही (MNS) भाजपच्या गळाला लागणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये शिवतीर्थावर (Shivtirth) जवळपास एक तास चर्चा झाली. यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती (MNS BJP Alliance) होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होण्याच्या चर्चा सुरु आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच मनसेचे तीन प्रमुख नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडली होती. त्यात आज पुन्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याने नेमकी काय उलथापालथ होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



राज ठाकरेंना येणार दिल्लीतून बोलावणं?


महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना दिल्लीतून बोलावलं जाण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून राज ठाकरे यांना दिल्ली दरबारी बोलवणं येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत चर्चा करून भाजप त्यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेऊ शकते, असंही बोललं जात आहे.



देवेंद्र फडणवीसांनीही दिले होते युतीचे संकेत


काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात भाजप-मनसे युतीबाबत बोलताना स्पष्ट म्हटलं होतं की, याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होईल. फडणवीसांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना होकार किंवा नकार देणं टाळलं होतं, यावेळी त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीची चर्चा कायम आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी