फरिदाबाद : दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागर हीचे वयाच्या १९वर्षी निधन झाल्याची माहिती मिळताच, चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.
सुहानीचे फरिदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान तिला औषधोपचारामुळे रिअॅक्शन झाले आणि शरिरात पाणी साचल्याने तिचा मृत्यू झाला. उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
सुहानीने दंगल चित्रपटातून सिनेमा सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तीने छोट्या बबीताची भुमिका निभावली आहे.